मंजुला मोदी तुम्ही लोकसभेपूर्वी मेल्या आहात, मतदान करता येणार नाही ? काय आहे हे प्रकरण

राज्यभरात दि. 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. त्याला पूर्ण राज्यात संमिश्र असा प्रतिसाद मिळाला आहे. पाऊस सुरु असून देखील अनेक नागरिकांनी आपले कर्तव्य पूर्ण केले आहे. मात्र यामध्ये असे अनेक नागरिक आहेत ज्यांना निवडणूक आयोगाच्या कारभारामुळे मतदान केंद्रावर जाऊनही मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
 
आर्थिक राजधानी मुंबईतील वांद्रे (बांद्रा) येथे मंजुला मोदी या ज्येष्ठ महिला मतदारांनाही असाच मनस्ताप सहन करावा लागला. त्या मतदान करण्यासाठी गेल्या तेव्हा मोदी यांना मतदान करण्याची परवानगी नाकारली गेली, मात्र मोदी यांनी मतदान ओळखपत्र असूनही परवानगी का नाकारली याची चौकशी केली असता त्यांना कारण ऐकून धक्काच बसला आहे, निवडणूक अधिकारी यांच्या नुसार  तुम्ही मृतांच्या यादीत असल्याचं त्यांना सांगितलं गेल असून, त्यामुळे त्यांचा मतदाना करायचे नाही असे स्पष्ट केले गेले. विशेष म्हणजे मंजुला मोदी यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील हेच कारण देत मतदानाला परवानगी नाकारण्यात आली होती.
 
लोकसभा निवडणुकीत मतदानापासून 66 वर्षीय मंजुला मोदी यांनी मुकल्यानंतर तात्काळ निवडणूक आयोगाकडे रीतसर सर्व कागदपत्र दिले आणि  अर्ज करत पुन्हा मतदान कार्ड मिळवले. मात्र, त्यानंतरही विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी त्यांना मतदान करता आले नाही. निवडणूक आयोगाच्या बेजबादार कारभारामुळे त्यांना मतदानही करता आले नाही.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती