माझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे : लता मंगेशकर

शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (16:49 IST)
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. माझी प्रकृती ठीक असून मी घरी आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नसल्याचा मेसेज व्हायरल होते. 
 
‘नमस्कार, माझ्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरत आहेत. पण तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका. माझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे,’ असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती