पेंशनधारकांनी खासदार गायकवाड यांच्या घराअमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन

शनिवार, 1 डिसेंबर 2018 (09:04 IST)
लातूर जिल्ह्यातील पेंशनधारकांनी  खासदार सुनील गायकवाड यांच्या घराअमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन-निदर्शने केली. पेंशनमध्ये वाढ करावी, खासदारांनी हा प्रश्न संसदेत मांडावा, किमान तीन हजार हजारांची पेंशन द्यावी, सन्मानपूर्वक पेंशन द्यावे, ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व सुविधा द्याव्यात, आरोग्य सुविधा द्याव्यात, मुलभूत सुविधा मिळाव्यात एवढी पेंशन द्यावी. महागाई भत्ता द्यावा या मागण्या मान्य न झाल्यास ४ ते ७ डिसेंबर दरम्यान जंतर मंतरवर आंदोलन करणार असल्याचा इशारा पेंशनधारक संघटनेचे राष्ट्रीय सचिव केएन अंबड यांनी दिला. या प्रश्नात लक्ष घालून तो संसदेत मांडू असे आश्वासन खा. सुनील गायकवाड यांनी दिले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती