Corona Vaccine साठी पात्र ठराल जर तुमचा जन्म या तारखेच्या आधी झाला असेल तरच तुम्ही

बुधवार, 31 मार्च 2021 (15:27 IST)
कोरोनाचा उद्रेक वाढत असून यावर नियंत्रण करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्यात येत आहे. भारतात 1 एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा विस्तार करण्यात येत असून आता 45 वर्षाहून अधिक वय असलेल्या कोणत्याही व्यक्तीला लस मिळणार आहे. 
 
कोरोना लसीकरणासाठी केवळ संबंधित यंत्रणेकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. पण यात महत्त्वाची बाब म्हणजे यासाठीची कट ऑफ डेट निश्चित करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2021 पासून 45 हून अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. यासाठी 1 जानेवारी 1977 हे आधारभूत वर्ष असणार आहे. म्हणजेच लस घेणार्‍यांचा जन्म 1 जानेवारी 1977 तारखेच्या आधी झाला असावा. या तारखेच्या आधी जन्मलेले लोक लसीकरणासाठी पात्र ठरतील.
 
उल्लेखनीय आहे की देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरवात झालीय. सुरवातीला केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना वॅक्सीन देण्यात आलं नंतर 1 मार्चपासून 60 वर्षांवरील सर्वांना लस उपलब्ध करून देण्यात आली. दरम्यान 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्यांचाही या टप्प्यात समावेश करण्यात आला होता. आता तिसर्‍या टप्प्यात 45 वर्षाहून अधिक वय असलेल्या कोणत्याही व्यक्तीला लस मिळणार आहे. 
 
नोंदणी करा
1 एप्रिलपासून कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतू अॅपवर लसीकरणासाठी नोंदणीला सुरवात होईल. लस घेण्याआधी रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. त्यानुसार तारीख आणि जागा निश्चित करण्यात येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती