नोकरीच्या शोध करत असणाऱ्यांसाठी LinkedIn चं नवीन करियर एक्सप्लोरर टूल लॉन्च

गुरूवार, 5 नोव्हेंबर 2020 (10:33 IST)
नोकरीचा शोध घेणाऱ्यांसाठी linkedln ने करियर एक्स्प्लोरर साधने लॉन्च केली आहेत. 
अमेरिकी एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड सर्व्हिस लिंक्डइन (LinkedIn) यांनी नोकरीच्या शोधात असणाऱ्या नवीन करियर एक्स्प्लोरर साधने लॉन्च केले आहेत. याचा द्वारे आपणास नोकरी शोधण्यास बरीच सोय होईल. या टूल किंवा साधनांच्या नावावरूनच स्पष्ट आहे एक्स्प्लोरर म्हणजे विस्तार. या टूलचे फायदे असे असणार की आपल्या सध्याच्या व्यवसाया व्यतिरिक्त इतर क्षेत्रात देखील आपण नोकरी शोधू शकता. या माध्यमातून आपणास नवीन नोकरी बद्दलच्या देखील काही सूचना मिळतील. तसेच वैकल्पिक रोजगार बद्दलची माहिती देखील उपलब्ध असणार.
 
कंपनीचे म्हणणे आहे की या दिवसात कोरोनामुळे ट्रॅव्हल, रिटेल आणि कार्पोरेटमध्ये काम करणारे लोक देखील दुसऱ्या क्षेत्रात नोकरी शोधत आहे. लिंक्डइन चे हे नवे करियर एक्स्प्लोरर टूल किंवा साधने जागतिक वापरकर्त्यांसाठी बीटा व्हर्जन किंवा आवृत्तीमध्ये प्रसिद्ध केले जात आहे. जे सध्या केवळ इंग्रजी भाषेत कार्य करतं. येत्या काळात या अ‍ॅप मध्ये बरेच अपडेट आणि बदल होऊ शकतात.
 
आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की करियर एक्सप्लोरर टूल च्या व्यतिरिक्त कंपनीने हायरिंग प्रोफाइल फोटो फ्रेम फीचर देखील सादर केले आहेत. या द्वारे थेट गरजू लोकांना शोधणे सोपे होईल. जर एखादा कर्मचारीच्या शोधात असेल तर तो या फ्रेमला त्याचा प्रोफाइल मध्ये लावू शकतो. याचा त्याला असा फायदा होणार की लोकांना प्रोफाइल फोटो बघूनच लक्षात येईल की या कंपनीमध्ये जागा आहे. या हायरिंग फ्रेम मध्ये #Hiring असे दिसणार. लिंक्डइन च्या मते, आपल्याकडे आपल्या प्रोफाइलमध्ये किमान पाच कौशल्ये असल्यास आपल्याला ही नोकरी मिळण्याची शक्यता 27 पटीने वाढते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती