लिपिक पदाच्या 2500 पेक्षा अधिक जागा, 6 नोव्हेंबर पर्यंत त्वरा अर्ज करा

गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (10:11 IST)
आयबीपीएस  लिपिक 2020 : जर आपण बँकेत नोकरी करण्याची इच्छा बाळगता आणि त्यासाठीच्या नोकरीचा शोध करत आहात तर त्या साठी आपल्याला ही उत्तम संधी आहे, कारण IBPS ने बँकेत लिपिकच्या पदांसाठी अनेक रिक्त जागा काढण्यात आली आहे.
 
विशेष म्हणजे या पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख नोव्हेंबर मध्ये आहे. 
वास्तविक, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शन) IBPS ने विविध बँकांमध्ये एकूण  2557 रिक्त पद काढण्यात आले आहेत. ज्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. अश्या परिस्थितीत अद्याप या रिक्त जागेसाठी अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी 6 नोव्हेंबर पर्यंतची संधी आहे. अश्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ ibps.in च्या माध्यमाने अर्ज करावे.
 
या रिक्त जागे द्वारे उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब आणि सिंध बँक इत्यादी विविध बँकांमध्ये नोकर्‍या मिळतील. ज्या उमेदवारांच्या अर्जाची निवड करण्यात येईल त्यांना 5 ,12 आणि 13 डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी बोलविण्यात येईल. प्रिलिम्स परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांना 24 जानेवारी 2021 रोजी मुख्य परीक्षा द्यावी लागणार.
 
आयबीपीएस लिपिक 2020 रिक्त पदांचा तपशील : 
एकूण - 2557 पदे 
 
आंध्र प्रदेश - 85 पदे
 
अंदमान निकोबार -1 पद 
 
अरुणाचल प्रदेश - 1 पद 
 
आसाम - 24 पदे
 
बिहार - 95 पदे
 
चंदीगड - 8 पदे
 
छत्तीसगड - 18 पदे
 
दादरा आणि नगर हवेली आणि दमणं आणि दीव -4 पदे
 
दिल्ली (एनसीटी) -93 पदे
 
गोवा - 25 पदे
 
गुजरात - 139 पदे
 
हरियाणा - 72 पदे
 
एचपी - 44 पदे 
 
जम्मू आणि काश्मीर - 7 पदे
झारखंड - 67 पदे
 
कर्नाटक - 221 पदे
 
केरळ - 120 पदे
 
लक्षद्वीप - 3 पदे 
 
एमपी -104 पदे
 
महाराष्ट्र - 3 71 पदे 
 
मणिपूर - 3 पदे 
 
मेघालय - 1 पद 
 
मिझोरम - 1 पद 
 
नागालँड - 5 पदे 
 
ओडिशा - 66 पदे 
 
पुडुचेरी - 4 पदे 
 
पंजाब - 162 पदे 
 
राजस्थान - 68 पदे 
 
सिक्कीम - 1 पद 
 
तामिळनाडू - 229 पदे
 
तेलंगणा -62 पदे 
 
त्रिपुरा - 12 पदे
 
उत्तर प्रदेश - 259 पदे 
 
उत्तराखंड - 30 पदे 
 
पश्चिम बंगाल - 151 पदे 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती