बाप्परे, सुमारे साडेतीन कोटी रुपयांची मेंढी

सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (08:21 IST)
लंडनमध्ये जगातल्या सगळ्यात महागड्या मेंढीचा लिलाव झाला. या मेंढीला ३,५०,००० गिनी (४९०,६५१ डॉलर)किंमतीला विकण्यात आलं आहे. भारतीय रुपयांनुसार या मेंढींची किंमत जवळपास साडेतीन कोटी रुपये एवढी आहे. मेंढीला जगात आत्तापर्यंत एवढी किंमत पहिल्यांदाच मिळाल्याचं सांगितलं जात आहे. 
 
टेक्सल ब्रीडची ही मेंढी गुरुवारी लानार्कमध्ये स्कॉटिश नॅशनल टेक्सल सेलमध्ये तीन शेतकऱ्यांनी विकत घेतली. टेक्सल्स ब्रीडची मेंढी जगात अत्यंत दुर्मिळ आहे. ही मेंढी नेदरलँडच्या किनारपट्टीपासून दूर असलेल्या टेक्सेलच्या छोट्याश्या बेटावर सापडते. टेक्सल ब्रीडची ही मेंढी विकत घेण्यासाठी ७-८ जण बोली लावत होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती