वाचा, रोनाल्डोने जगातील सर्वात महागडी घेतली

बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (09:04 IST)
पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने जगातील सर्वात महागडी बुगाटी सेंटोडीएसी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल ७५ कोटी रुपये आहे. रोनाल्डोने इन्स्टाग्रामवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.
 
बुगाटीने सेंटोडीएसी या केवळ १० कार बनवल्या आहेत. ही कार ३८० किमी प्रति तास वेग पकडते. २.४ सेकंदात ही कार ६० किमी प्रति तास वेग पडकते. रोनाल्डोने नुकतेच ३६ वे पर्व असलेले Serie A या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा जिंकल्यावर त्याने ही कार खरेदी केली आहे. रोनाल्डोला या गाडीसाठी २०२१ हे नवीन वर्ष येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 
 
रोनाल्डोकडे २६४ कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या कार आहेत. स्पोर्ट्सवेअर ब्रँड बुगाटी आणि ऑटोमोबाईल ब्रँड नाईकी यांनी मिळून रोनाल्डोसाठी एक विशिष्ट बूट देखील बनवला आहे. ‘Mercurial Superfly VII CR7’ या बूटचे नाव आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती