धोनीच्या स्वराज ट्रॅक्टरवर आनंद महिद्रा यांची भन्नाट कमेंट

सोमवार, 8 जून 2020 (21:55 IST)
टीम इंडियाचा माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी  ने एक नवा व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये धोनी आपल्या नव्या वाहनावर बसून फेरफटका मारण्याचा आनंद घेताना दिसला. हे वाहन म्हणजे बाईक किंवा कार नव्हती, धोनी चक्क ट्रॅक्टर चालवत होता. 
 
सीएसकेने ट्विटरवर धोनीचा ट्रॅक्टर चालविण्याचा आनंद घेतनाचा व्हिडिओ पोस्ट केला.” #थाला धोनी आपल्या नव्या वाहनावर आरूढ होऊन राजा सरांना भेटला!”, असे कॅप्शनही पोस्टखाली लिहिले. धोनीने महिंद्रा कंपनीचा स्वराज ट्रॅक्टर विकत घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिद्रा यांनी भन्नाट कमेंट करत धोनीची स्तुती केली. 
 
त्यांच्याच कंपनीचा ट्रॅक्टर विकत घेतलेल्या धोनीबद्दल ते म्हणाले, “मला आधीपासूनच माहिती होतं की धोनीची निर्णयक्षमता आणि अंदाज बांधण्याचे सामर्थ्य खूपच वाखाणण्याजोगे आहे.” 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती