फळ आणि भाज्या स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

शनिवार, 6 जून 2020 (14:04 IST)
देशातील कोरोना व्हारसचे वाढते प्रकरण आणि लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या सवलतींमुळे लोकं आता बिनधास्त बाहेर ये- जा करत आहे. या दरम्यान आपण स्वतःचा सुरक्षतेसाठी वेग वेगळ्या पद्धती अवलंबत आहोत, पण आपण अन्नाच्या सुरक्षे बाबत जागरूक आहात का ?  
 
या वेळी लोकांसमोर हे गंभीर आवाहन उभारले आहे की आपण स्वता बरोबरच फळ आणि भाज्यांना कोरोनापासून कसे वाचवता येऊ शकतं. अन्न सुरक्षते बाबत जागरूकता आणि माहिती असणे जास्त महत्त्वाचे आहेत. कारण बाजारपेठेतून आणल्यावर त्यांना स्वच्छ करणे खूपच जास्त गरजेचे आहे. खाद्य सामुग्रीला सुरक्षित कसं ठेवता येईल हा मोठा प्रश्न सर्वांसोमर आहेच. 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते फूड सेफ्टी म्हणजे फळ आणि भाज्या हे नाव सर्वात आधी येते आणि हे जाणून घेणे आवश्यक आहे की विषाणू फळ आणि भाज्यांवर काही तास सक्रिय असतो. त्यासाठी ह्याचा वरून विषाणूंना घालविण्यासाठी भाज्यांना सूर्याचा प्रकाशात ठेवावे. असे केल्याने त्या उष्णतेमुळे फळ आणि भाज्या सुरक्षित ठेवण्यास मदत मिळते. 
 
या गोष्टीची नोंद घेणे आवश्यक आहे की फळ आणि भाज्या घरी आणल्यावर काही काळ अजिबात स्पर्श करू नये. 
भाज्यांच्या पिशव्यांना किमान 4 तास वेगळे ठेवावे. 
या दरम्यान त्यांना बाहेर काढू नका.
आपल्याला गरज असल्यास बेकिंग सोड्याला पाण्यामध्ये टाकून उकळवून घ्या आणि त्या पाण्यामध्ये भाज्या तशाच भिजू द्या. 
लक्षात घेण्या सारखे असे की या फळ आणि भाज्यांवर सेनेटाईझर वापरू नका कारण हे फक्त आपल्या शरीर आणि स्टील आणि धातूंसारख्या वस्तूंवर वापरले जाते.
या व्यतिरिक्त भाज्यांना स्वच्छ करण्यासाठी पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेटचे एक थेंब मिसळून देखील अन्नाची सुरक्षता वाढवू शकतो.
 
तज्ज्ञांप्रमाणे स्वयंपाक करण्यासाठी नेहमी ताज्या भाज्यांचा वापर करायला हवा. जर का आपण बऱ्याच दिवस भाज्यांचा साठा करून ठेवता तर त्यामधील पोषकता संपते आणि आधीच्या प्रमाणे त्यांचे गुणधर्म नसतात. कुठल्याही वस्तूंना फ्रीजमध्ये साठवून ठेवल्याने त्याचे पोषक तत्त्वे कमी होतात. त्याचे प्रभावी गुणधर्म कमी होतात. 
 
एका संशोधनानुसार, सर्व भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यामधील व्हिटॅमिन सी कमी होतं. असे होण्याचे कारण म्हणजे की फ्रीजमधली गॅस ऑक्सिडायझेशनची प्रक्रिया थांबवून देतं. ज्यामुळे भाज्यांचे रंग बदलतात.
 
ताजे किंवा डबाबंद यापैकी कोणते खाद्य पदार्थ अधिक योग्य
एका संशोधनाच्यानुसार, काही तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे काही दशकांत अन्नाला रेफ्रिजरेट करण्याची प्रक्रिया जास्त प्रमाणात वाढली आहे. यामुळे केवळ अन्नपदार्थाच्या पोषक तत्त्वांमध्ये कमतरता तर येतेच तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे फळ आणि भाज्यांमधील पौष्टिक तत्त्व कमी होऊ लागतात. या परी जर आपण ताज्या फळ आणि भाज्या खाल्ल्यावर आपल्याला त्यामधील सर्व पोषण मिळू शकतं. एवढेच नव्हे तर आपण भाज्यांना चांगल्या प्रकारे शिजवून त्यामधील जिवाणूंना बाहेर काढून आपल्या भाज्यांना निरोगी बनवू शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती