एका सामन्यासाठी 'हे' खेळाडू घेतात 15 कोटी, कोण आहे सर्वात महागडा कर्णधार?

शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (13:36 IST)
टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) के स्थगित झाल्यानंतर बीसीसीआय संपूर्ण जोशात आयपीएल-2020च्या तयारीला लागली आहे. 29 मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा आता अखेर 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.आयपीएलच्या लिलावात काही खेळाडूंना दहा कोटींपेक्षा जास्त किंमतीत खरेदी केलं आहे. यात एक खेळाडू असाही आहे ज्याला संघाच्या कर्णधारापेक्षा दुप्पट रक्कम मोजून घेतलं आहे.मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
 
त्याच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत चारवेळा मुंबईने विजेतेपद पटकावलं आहे. मुंबई इंडियन्स रोहितला एका हंगामासाठी 15 कोटी रुपये मोजते.आयपीएलमध्ये मुंबईनंतर चेन्नईने तीन वेळा विजेतेपद मिळवलं आहे. सुरुवातीपासून संघाची जबाबदारी धोनीच्या खांद्यावर आहे. धोनीला पुढच्या हंगामासाठी चेन्नई 15 कोटी रुपये देणार आहे.दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेला श्रेयस अय्यर सर्वात युवा कर्णधार ठरला. आयपीएलमध्ये सात वर्षानंतर दिल्लीने त्याच्या नेतृत्वाखाली सेमीफायनलमध्ये धडक मारली. 2020 च्या हंगामासाठी श्रेयस अय्यरला दिल्लीचा संघ 7 कोटी रुपये देणार आहे.सध्या फॉर्ममध्ये असलेला भारताचा क्रिकेटपटू केएल राहुल किंग्ज इलेव्हनचे नेतृत्व करणार आहे.
 
पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवणाऱ्या केएल राहुलला पंजाबचा संघ या हंगामात 11 कोटी रुपये देणार आहे.सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असलेल्या न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनला 2018 मध्ये नेतृत्व सोपवलं. आयपीएलमध्ये पहिल्यांदा नेतृत्व करत त्याने संघाला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. यंदाच्या हंगामात केन विल्यम्सनला तीन कोटी रुपये देणार आहे.ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ आयपीएलमध्ये पहिल्यांदा 2010 मध्ये आरसीबीकडून खेळला. त्यानंतर आतापर्यंत चार संघाकडून स्मिथ आयपीएलमध्ये उतरला. यंदा राजस्थानने त्याला 12 कोटी मोजून संघात घेतलं आहे.
 
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली 2013 पासून आरसीबीचा कर्णधार आहे. आतापर्यंत एकदाही आरसीबीला विजेतेपद जिंकता आलेलं नाही. विराट कोहलीसाठी आरसीबीने 17 कोटी रुपये मोजले आहेत.केकेआरचे नेतृत्व दिनेश कार्तिककडे देण्यात आलं आहे. आतापर्यंत दिनेश कार्तिक सहा संघांकडून खेळला आहे. त्याला 2020 मध्ये केकेआर 7.4 कोटी रुपये देणार आहे.आयपीएलच्या लिलावात केकेआरने पॅट कमिन्सला 15.5 कोटी रुपये मोजून संघात घेतलं आहे. त्याच्यापेक्षा अर्धी रक्कम कर्णधार दिनेश कार्तिकला देण्यात येत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती