हॉलिवूडच्या सुपरमॅनचे निधन

शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019 (10:30 IST)
हॉलिवूड सुपरमॅन क्रिस्टोफर डेनिसचं (५२) निधन झालं आहे. सैन फर्नांडो दरीमध्ये त्यांचा मृतावस्थेत सापडला. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याचे शरीर कपडे दान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बिनमध्ये पडलेलं दिसलं. एका तपास करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार क्रिस्टोफर काही दिवसांपासून बेघर होता. ज्यावेळी त्याचे निधन झाले त्यावेळी कदाचित तो कपडे गोळा करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या निधनानंतर त्याचे चाहते सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. 
 
डेनिसच्या जीवनात बरेच चढउतार आले होते. एकेकाळी स्टार असणाऱ्या डेनिसला गेल्या काही दिवसांपासून बिकट परिस्थितीचा सामना करत होता. त्याच्याकडे राहण्यासाठी घर देखील नव्हते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती