"गेम ऑफ थ्रोन्स" चा जांगडगुंता सुटला

मंगळवार, 28 मे 2019 (12:16 IST)
उन्हाच्या झळा लागत असताना जर कोणी "विंटर इज हियर" (हिवाळा आला आहे) असं म्हणालं, तर त्याला वेड्यात काढू नका. तो व्यक्ती जगातील सर्वात लोकप्रिय इंग्रजी मालिका "गेम ऑफ थ्रोन्स" चा चाहता असेल. ८ वर्ष, ८ सत्र आणि ७३ एपिसोड नंतर, नुकताच या काल्पनिक मालिकेचा समारोप झाला. आठवा सत्र दोन वर्षाचा कालावधी नंतर प्रदर्शित झाला असून मालिकेचा शेवट आहे, त्यामुळे उत्सुकता शिखरावर पहुचली होती. आपल्याला या एपिसोड चे स्पॉईलर्स कळू नये म्हणून लाखो भारतीयांनी गेल्या काही सोमवार चक्क सकाळी ६:३० वाजता उठून, हे एपिसोड हॉटस्टार अँप वर प्रीमियम सदस्यता घेऊन पाहिले. आठव्या सत्रातील प्रत्येक एपिसोडला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, ट्विटर वर हॅशटॅग गॉट (#GOT) ५० लाख पेक्षा जास्त वेळा चर्चेत राहिला आणि नंबर एक चा ट्रेंड ठरला. फेसबुक, इंस्टाग्राम वर सुद्धा भरपूर विनोदी मीम पसरवल्या गेल्या. "कटप्पा ने बाहुबली को क्यू मारा" सारखंच या मालिकेची शेवट कसा होईल याची उत्सुकता शिगेला पोहचली. या मालिकेला आतापर्यंत ४७ प्रतिष्ठित प्राइमटाइम एमी अवॉर्ड्स भेटले आहे याचे कारण उत्कृष्ट पटकथा, दिग्दर्शन, संगीत. एखाद्या हॉलिवूड चित्रपटा पेक्षा सुद्धा जास्त भव्य-दिव्य चित्रीकरण, व्हिज्युअल इफेक्ट्स, या मालिकेच्या यशाचे प्रमुख कारण ठरले आहे.
 
ही मालिका पाहिल्यानंतर प्रश्न हा पडतो की, आपल्या कडे अशी मालिका का बनवत नाही?? मराठी मालिका बनवणारे सासू-सून भांडण्यापेक्षा काही वेगळं करू शकतात का?? मराठी श्रुष्टी मध्ये आऊट ऑफ बॉक्स विचार करणारे आहे खूप लोकं आहे, मग निर्माते धाडस करत नसेल का?? आजचा युवाला काही तरी वेगळे पाहिजे असतं, तो या सासू-सुनाचा भांडणामध्ये पडत नाही. आपला मोबाईल काढतो, कुठल्यातरी अँप वरून वेब-सिरीज कडे वळतोय. इंग्लिश-हिंदी बरीच मालिका लोकप्रिय होतं आहे. वेब सिरीज वर तर सेन्सरशिप सुद्धा लागत नाही, तरीही तिथे चांगल्या मराठी मालिकांची उणीव जाणवते. मालिका रोज घरोघरी बघितल्या जातात, चित्रपट केवळ २-३ तास, निम्मी पेक्षा जास्त बघण्यासारखी सुद्धा नसतात. त्यामुळे मालिका चा एक वेगळं महत्व आहे, नुसतं मनोरंजन म्हणून नाही तर लोकांची विचारधारा बदलण्याची क्षमता असती.
 
मराठी तरुण/तरुणींना जर मालिका बद्दल माहिती असेल तर समजायचं त्यांचा घरात आई,आजी, काकू ७-९:३० दरम्यान टीव्ही वर तेच बघत असतात. कोणाची हिम्मत होत नाही रिमोटला हाथ लावायची. तसही घरातली स्त्री कुटुंब साठी एवढा काही करत असतात, चॅनेल बदलू का? क्रिकेट, आयपील लावू का असं विचारू सुद्धा करू वाटत नाही. दिवसातले २-३ तास तेवढेच घरातील स्त्रिया चा मनोरंजनसाठी.तरुण मंडळी मराठी मालिका बघण्याचा लाफड्यात पडत नाही. मराठी मालिका बनवणारी मंडळी ने "गेम ऑफ थ्रोन्स" बघायला पाहिजे, चित्रपटा पेक्षा उत्तम आणि जगातील सर्वात लोकप्रिय मालिका कशी बनवली हे त्यांचा कडून शिकण्या सारखं आहे. चांगली कथा लिहणारे मराठी लोकं बरीच आहे, पण त्यांना छोट्या परदावर उतरून वेड लावणारे कोणी दिसत नाही. आहे का कुठली अशी मराठी मालिका ज्याचा वेड संपूर्ण तरुणनां आहे?? कोणी करेल का धाडस??
 
पण नेमकी काय आहे "गेम ऑफ थ्रोन्स"??
ही मालिका अमेरिकी लेखक जॉर्जे आर.आर. मार्टिन च्या काल्पनिक कादंबरी "अ सॉंग ऑफ आईस ऍण्ड फायर" वर आधारित असून डेव्हिड बेनीओफ आणि डी.बी.व्हीस या मालिकांचे मुख्य लेखक आहे. अमेरिका चे एचबीओ वाहिनी वर २०११ पासून दर वर्षी नवीन पर्व सादर होत आहे. ‘वेस्टोरॉस’ आणि 'इसॉस" या दोन काल्पनिक महाद्वीपची कथा आहे. वेस्टोरॉस मध्ये सात राज्य असून किंग्स लँडिंग ही या साम्राज्याची राजधानी आहे. या सात लहान राज्यांवर राज्य करणारा राजा ज्या सिंहासनावर बसतो त्याला ‘आयर्न थ्रोन’ म्हटले जाते, त्या भोवती फिरणारं राजकरण म्हणजेच गेम ऑफ थ्रोन्स. या सोबतच प्राचीन काळातील झोम्बी दानव (व्हाईट वॉकर्स) पासून संरक्षण करणारे एका उंच बर्फाची भिंत (द वॉल) आणि तेथील सैन्य नाईट्स वॉच सुद्धा कथेचा महत्पूर्ण भाग आहे.
वेस्टोरॉस मधील सात राज्य:-
1. किंग्डम ऑफ द नॉर्थ (हाऊस स्टार्क द्वारा शासित)
2. किंग्डम ऑफ द माउंटन अँड द व्हेल (हाउस अरेन द्वारा शासित)
3. किंग्डम ऑफ द ईस्ल्स अँड द रिव्हर (हाऊस होरे द्वारा शासित)
4. किंग्डम ऑफ द रॉक (हाऊस लॅनिस्टर द्वारा शासित)
5. किंगडम ऑफ द रिच (हाउस गार्डनर द्वारा शासित)
6. किंगडम ऑफ द स्टॉर्ममँड (हाऊस डुर्रँडन द्वारा शासित)
7. प्रिन्सडॉम ऑफ डोर्न (हाऊस मार्टेल द्वारा शासित)
 
मुख्य कथा:-
वेस्ट्रॉसचा राजा रॉबर्ट बराथियन आपल्या वजीर च्या मृत्यनंतर आपला विश्वासू मित्र नेड स्टार्कला भेटायला विंटरफेलला येतो. त्याला वजीर बनण्याचे आमंत्रण देतो, त्यासोबतच आपले राजकुमार "जोफरी" चे लग्न नेड स्टार्कच्या मोठी सुपुत्री "सानसा" सोबत ठरवतो. नेड स्टार्क आपल्या बायकोला व मुलांना विंटरफेल मध्ये राहू देतो व दोन्ही मुलीसहित राजधानीत जातो. राजा रॉबर्ट बराथियन च्या अकल्पनिय मृत्यू होते आणि खऱ्या खेळला सुरुवात होती. कमी वयाचा राजकुमार जोफरीला सिंहासन मिळते पण रॉबर्ट बराथियनचा भाऊ स्टांनीस,आपणच सिंहासनाचे खरे वारसदार आहे यासाठी युद्ध पुकारतो. खरं तर रॉबर्ट बराथियन ने वर्षानवर्षो राज्य करणारे टारगॅरियन कुटुंबाला युद्ध मध्ये पराभूत करून सिंहासन काबीज केले असते. टारगॅरियन कुटुंबाचे शेवटचे वंशज डॅनेरीस आणि विसेरीस ने युद्धवेळी पळ काढून इसॉस महाद्वीप मध्ये शरण घेतलेली असती. या पुढे बराथियन,टारगॅरियन, स्टार्क कुटुंबाचे आर्यन थ्रोन सिंहासन मिळवण्यासाठी युद्ध आणि संघर्ष वर मुख्य कथा अवलूंबून आहे. शाही परिवार मधील वंशवाद, राजकारण, निष्ठावात सहकारी, विश्वासघाती हल्ले, वासना, मृत्य नंतर जीवन,थक्क करणारे युद्ध आणि तीन आग ओकणारे ड्रॅगन या मालिकेचे उत्सुकता वाढवतात. बरीच एपिसोड थक्क करणारी आहेत पण सातव्या सत्राचे  सहावे एपिसोड मध्ये तुम्हाला खुर्चीला चिटकून राहू वाटेल असा थरार निर्माण केला आहे. जॉन स्नो आणि त्याचे पाच सहकारी एका गोठलेला तलाव च्या मध्य भागी हजारो झोम्बी दानव (व्हाईट वॉकर्स) च्या चक्रव्यूह मध्ये अडकतात, तिथून त्यांची सुटका कशी होती, असा अंगावर शाहारे आणणारा अविस्मरणीय एपिसोड चाहत्यानं मध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. 
 
मुख्य व लोकप्रिय पात्रे:-
कुठला पात्र कधी काय करतील, कधी विश्वासघात करेल याची भनक सुद्धा दिग्दर्शकाने प्रेक्षकाने लागू दिली नाही. १५० पेक्षा ही जास्त या मालिके मध्ये पात्र आहे तरीही डॅनेरिस टारगॅरियन(मदर ऑफ थ्री ड्रॅगनस), जॉन स्नो, टीरियन लॅनिस्टर, जेमी लाँनिस्टर, सरसी लाँनिस्टर, आर्या स्टार्क, ब्रेन स्टार्क, सांडोर "द होउंड" प्रमुख पात्र आहे. प्रत्येक पात्राची स्वत:ची एक वेगळीच पार्श्वभूमी आहे आणि प्रचंड लोकप्रियता आहे. एकच शब्द बोलणारा "हॉडोर" नावाचं पात्र लोकांना मध्ये सर्वात लाडका पात्र राहिला आहे, अनेक लोकांनी तर दिग्दर्शक आणि लेखकाला त्याचा मृत्यनंतर शिव्या घातल्या. त्याच बरोबर रॅम्से बोल्टन, जोफरी लाँनिस्टर सर्वात नावडते पात्र आहेत. जोफरी लाँनिस्टर मरण पावलेल्या नंतर तर चक्क न्यूयॉर्कच्या रस्त्यानावर लोकांनी आतिषबाजी करून साजरी केली होती.  
 
चित्रीकरण:- 
२०१० मध्ये या मालिकेची चित्रीकरणला सुरुवात झाली. नॉर्थेर्न आयर्लंड, कॅनडा, क्रुएशिया, आइसलँड, मालता, मोरक्को,स्कॉटलंड, स्पेन आणि अमेरिका येथील तब्बल ९ देशात भुवया उंचावणारे मोहक ठिकाण निवडले आहे. इतक्या वेगवेगळ्या देशात एकावेळी सगळी चित्रकरण सुरु ठेवणे अत्यंत आव्हानात्मक होते . त्यामुळे एकूण ७३ एपिसोडला तब्बल २३ दिग्दर्शक लाभले आहे.
 
डाउनलोडची ओढ:-
प्रत्येक एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतर डाउनलोड करून कधी बघता येईल,याची ओढ लागली होती. यामुळे  सोमवारी सकाळी ७-१० दरम्यान, गेम ऑफ थ्रोन्स  सर्वात जास्त गुगल वर शोधले गेले. याचा फायदा काही हॅकर्स ने सुद्धा उचला आणि गेम ऑफ थ्रोन्सचा टोरेंट मध्ये भलतेच काही टाकून व्हायरस सुद्धा पसरवले.
 
कडू शेवट??:-
शक्तिशाली डॅनेरिस टारगॅरियन आपल्या ड्रॅगनसोबत राजधानी किंग्स लँडिंगला व तेथील निष्पाप हजारो लोकांना जाळून टाकती. मुख्य खलनायक सरसी लॅनिस्टरचा राजमहल खाली चिरडून मृत्यू होतो, अशा सोप्या पद्धतीने चाहत्यांना तिचा अंत पचला नाही. डॅनेरिस टारगॅरियनच्या क्रूरतेमुळें मुख्य नायक जॉन स्नो तिचा खून करतो. जॉन स्नोला शिक्षा म्हणून नाईट्स वॉच सैन्य (द वॉल) येथे परत पाठून देतात. उरलेले सहा प्रांताचे राजे कुठेही शर्यतीत नसलेला अपंग ब्रेन स्टार्कला महाराजा निवडतात. वेस्ट्रॉस मध्ये यापुढे कुठलाही राजा वंशामुळे नव्हे तर आपल्या कर्माने निवडला जाईल असा नियम बाजवण्यात येतो. जसं महाभारत मध्ये राजा भरतने हस्तिनापूरचा राजा वंशावाद थांबवले होते तसेच. असा अनपेक्षित शेवट पाहून करोडो चाहत्यांनी निराशा व्यक्त केली. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर तर संपूर्ण आठवा सीजन नाविन्याने बनावे अशी मोहीम सुद्धा जोर पकडत आहे. सगळ्यां पात्रांना आपल्या कर्मा प्रमाणे फळ भेटते असा मुख्य दिग्दर्शकचे मत आहे आणि हाच योग्य शेवट आहे.
 
उत्तराधार्त??:-
गेम ऑफ थ्रोनस चा उत्तरार्धावरील असलेल्या मालिकेची चित्रीकरणला सुरुवात झाली आह. मालिकेचे नाव "ब्लडमून" ठरले असून, अशी माहिती चाहत्यानं पसरताच कधी प्रदर्शित होईल याची उत्सुकता लागली आहे.
 
-- अभिजित देशमुख

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती