Coronavirus: मुंबईत आणखी एक बळी

गुरूवार, 26 मार्च 2020 (22:09 IST)
राज्यात आज दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात करोनामुळे झालेल्या मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. 
 
महिलेला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र तिच्या मृत्यूचं नेमकं कारण आम्ही तपास आहोत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. याआधी वाशीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. 
 
सध्या राज्यात करोनाचे १२५ रुग्ण आहेत. दरम्यान आत्तापर्यंत १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती