राजीव बजाज यांच्याकडून लॉकडाउनवर टीका

गुरूवार, 4 जून 2020 (16:34 IST)
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे भारतातील अनेक तज्ज्ञ व्यक्ती आणि उद्योगपतींशी संवाद साधत आहे. दरम्यान, गुरूवारी त्यांनी देशातील उद्योगपती आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्याशी संवाद साधला. या चर्चेदरम्यान बजाज यांनी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनवरही टीका केली. “तुम्ही करोनाऐवजी अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आणला,” असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
 
“भारतानं शेजाऱ्यांकडून शिकण्याऐवजी पाश्चिमात्यांच अनुकरण केलं. त्यांची भौगोलिक स्थिती, अन्य परिस्थिती आणि तापमान यांसारख्या गोष्टी निराळ्या आहे. आपण कठोर लॉकडाउन लागू करण्याचा प्रयत्न केला. परंतु तसं करता आलं नाही. यामुळे मात्र अर्थव्यवस्थेवर मात्र मोठा परिणाम झाला. करोनाच्या आलेखाऐवजी अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आला,” असं म्हणत बजाज यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
 
“भारताला जपान किंवा स्वीडनप्रमाणे पाऊल उचलणं अपेक्षित होतं. ते हर्ड इम्युनिटीच्या मार्गावर पुढे गेले. याचा अर्थ असा नाही की त्यांनी ज्या लोकांना करोनाचा धोका अधिक होता त्यांना मरण्यासाठी सोडून दिलं. याचा अर्थ असा आहे की सॅनिटायझेशन, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं असा होता. आपल्याकडे दुर्देवानं पूर्ण लॉकडाउन राबवलाच गेला नाही,” असं ते म्हणाले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती