Car मध्ये Hand Sanitizer ठेवण्याची चूक करू नका

सोमवार, 1 जून 2020 (12:33 IST)
सध्या कोरोना विषाणूपासून वाचण्याचे सतत प्रयत्न चालू आहे. आणि हे टाळण्यासाठी सॅनिटायझर, मास्क आणि सामाजिक अंतरावर जोर देण्यात येत आहे. मास्क सामाजिक अंतर, हँड सॅनिटायझर सर्व आवश्यक आहे पण सॅनिटायझरचा वापर आपल्याला काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. कारण सॅनिटायझर मध्ये कमीत कमी 60 टक्के अल्कोहल असतं. ज्यामुळे वेगाने आगीचा धोका वाढतो. 
 
आपण जेव्हा आपल्या हातांना सॅनिटायझर लावता तेव्हा गॅस, लायटर, आगपेटी सारख्या गोष्टींपासून लांबच राहावं. कारण सॅनिटायझरमध्ये अल्कोहल असल्याने ते लवकर पेट घेतं. या सह सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या हँड सॅनिटायझरला कधीही कार मध्ये सोडू नये. आपल्यापैकी बरेचशे लोकं असे आहेत की त्यांना सवय असते वस्तूंचा वापर करून कार मध्ये सोडून जाण्याची. पण त्या हँड सॅनिटायझर बाबत अशी हलगर्जी अजिबात करू नका. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि अती उष्णतेमुळे कार भट्टीप्रमाणे तापते. अश्या परिस्थितीत आपण सॅनिटायझर कार मध्ये सोडले तर या मुळे कारला आग लागण्याची दाट शक्यता असते. कारण अल्कोहलयुक्त कोणतेही पदार्थ उष्णतेच्या संपर्कात आल्यावर स्फोट होऊ शकतं. त्यामुळे आपण या गोष्टीला दुर्लक्षित करू नका.
 
सॅनिटायझर कसे वापरावे  ?
आपले हात घाण असल्यास सॅनिटायझर वापरू नये. सर्वप्रथम साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुऊन घ्या. हँड सॅनिटायझर मध्ये असलेले अल्कोहल तेव्हाच काम करतं ज्यावेळी आपले हात कोरडे असतील. 
 
अश्या वेळेस आपण हातावर 2 ते 3 थेंब सॅनिटायझरच्या टाका. त्यांना आपल्या हातांवर चोळा. बोटांच्या मध्ये स्वच्छ करा आणि तळहाताच्या मागे देखील लावा. कोरडे होण्यापूर्वी हाताला धुऊ नका आणि पुसूही नका.
 
घरात वापरले जाणारे साबण सॅनिटायझरपेक्षा अधिक प्रभावी आहेत. आपण हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर ऐवजी साबणाचा वापर करू शकता. आपण घराच्या बाहेर जात असल्यास सॅनिटायझर वापरू शकता. पण घरात हात नेहमीच साबणाने स्वच्छ करावे. तसेच आपल्या मुलांना या बद्दलची माहिती द्या. लक्षात असू द्या की जर का लहान मुलांनी सॅनिटायझर वापरले असल्यास ते आगीच्या संपर्कात येऊ नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती