उन्हाळ्याची रेसिपी : विड्याच्या पानाचे थंड सरबत

मंगळवार, 26 मे 2020 (17:38 IST)
साहित्य : 10 विड्याचे पान, 20 पाण्यात भिजवलेली वेलची, 1/2 कप गुलकंद, 1/2 कप बडी शेप भिजवलेली, 1 कप साखर, चिमूट भर खाण्याचा रंग (हिरवा), 1 चमचा लिंबाचा रस.
 
कृती : सर्वप्रथम विड्याचे पानं स्वच्छ धुवून घ्यावे. नंतर ते मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. वाटताना त्यामध्ये भिजवलेली वेलची घालाव्या. बारीक वाटून पेस्ट करावी. ह्या पेस्ट मध्ये गुलकंद टाकून परत फिरवून घ्यावे. एका मिक्सरच्या भांड्यात बडी शेप वाटून घ्यावी आणि त्या मधील पाणी लागत लागत टाकून बारीक पेस्ट करावी. 
 
आता एका भांड्यात साखर घालून त्यामध्ये पाणी घालून उकळायला ठेवावे. त्या उकळत्या पाण्यात विड्याच्या पानाची पेस्ट आणि बडी शेपची पेस्ट घालून मंद आचेवर उकळून घ्यावे. त्यामध्ये खाण्याचा हिरवा रंग, एक चमचा लिंबाचा रस घालून ढवळावे. जेणे करून सरबत थंड झाल्यावर गोठणार नाही. आता हे सरबत थंड झाल्यावर गाळून बरणीमध्ये किंवा बाटलीत भरून ठेवावे. उरलेल्या गाळाचे इन्स्टंट सरबत करून देखील पिता येईल. विड्याच्या पानाचे सरबत एका ग्लासात बर्फ घालून त्यात 2 ते 3 चमचे पानाचे सरबत घालून वरून पाणी मिसळून थंडगार सर्व्ह करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती