‘वॉर’ ने पहिल्याच दिवशी कमाईचे सगळे विक्रम मोडले

शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019 (10:11 IST)
हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी कमाईचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत.  बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत २०१९ मधील पहिल्या दिवशी सर्वाधीक कमाई करणारा वॉर हा चित्रपट ठरला.
 
पहिल्या दिवशी वॉरने ५३.३५ कोटी कमाई केली आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्शने ट्वीट करत ही माहिती दिली. ‘वॉर’च्या आधी अमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ ने सर्वात मोठी ओपनिंग मिळवण्याचा मान मिळवला होता. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ ने पहिल्या दिवशी ५०.७५ कोटी रूपयांची कमाई केली होती. आता वॉरने ५३.३५ कोटींची कमाई करत ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ला मागे टाकले आहे. 
 
वॉर हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगु या तीन भाषांमध्ये चार हजार चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. केवळ भारतात नाही तर ऑस्ट्रेलियामध्ये देखील वॉर सर्वाधीक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती