कॅटरीना कैफ 'मजूर', केवळ बाहेरुन सुंदर, रितिक रोशनचे विचार

रितिक रोशन आपल्या अपकमिंग अॅक्शन थ्रिलर सिनेमा 'वॉर' मुळे चर्चेत आहे. यात रितिकच्या व्यतिरिक्त टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे. अलीकडेच रितिक रोशनने कॅटरीना कैफला मजूर म्हटले.
 
रितिक आणि कॅटरीना अनेक चित्रपटांमध्ये सोबत दिसले आहेत. या दोघांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर दर्शकांना खूप आवडली होती, मग तो चित्रपट 'बँग बँग' असो वा 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'.
 
एका साक्षात्कारामध्ये कॅटरीना कैफबद्दल रितिक म्हणाला की ती खूप मेहनती कलाकार आहे. ती सिनेमात एका कष्टकारी कामगाराप्रमाणे हार्ड वर्क करते. रितिकने म्हटलं की हे काही असे आहे जे मी कॅटरीनाबद्दल नेहमी सांगू इच्छित असतो. हे ती एका प्रकारे अपमानासारखे घेते, परंतू माझ्या हिशोबाने ही एक सुविचारित कौतुक आहे. मी कॅटरीनाला 'मजदूर' म्हणतो. एक श्रमिक,  एक कर्मी. मी आतापर्यंत बघितलेले सर्वश्रेष्ठ मजदूरांमधून कॅटरीना एक आहे.
 
वर्क फ्रंटबद्दल बोलायला गेलं तर अलीकडेच रितिक रोशनचा सिनेमा 'सुपर 30' रिलीज झाला होता. हा सिनेमा बिहारच्या गणितज्ञ आनंद कुमारच्या जीवनावर आधारित होता, या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. रितिकचं पुढील चित्रपट 'वॉर' 2 ऑक्टोबरमध्ये रिलीज होत आहे. याचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे.
 
कॅटरीना कैफबद्दल सांगायचं तर ती लवकरच अक्षय कुमारच्या चित्रपट 'सूर्यवंशी' मध्ये दिसणार आहे. याची शूटिंग देखील सुरू झालेली आहे. कॅटरीनाचा जिरो सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती