सलमान खानने आपल्या बॉडीगार्डला सर्वांसमोर चापट मारली, शेराने सांगितले काय घडलं...

सलमान खान हल्ली आपल्या चित्रपट भारतमुळे नव्हे तर आपल्या बॉडीगार्डला मारलेल्या चापटमुळे चर्चेत आहे. सलमान चित्रपट 'भारत' च्या प्रीमियर मध्ये पोहचल्यावर ही घटना घडली. येथे एका बॉडीगार्डने मुलाशी अशिष्ट व्यवहार केल्यामुळे सलमानचा पार चढला आणि त्याने सर्वांसमोर आपल्याच बॉडीगार्डला चापट मारली. व्हिडिओ लगेच व्हायरल होताना डिलीट करण्यात आला.
 
या घटनेवर सलमानच्या बॉडीगार्ड शेरा याचे वक्तव्यानुसार 'मालकाला लवकर राग येतो. ते मुलांविषयी अत्यंत प्रोटेक्टिव्ह असतात.' रिपोर्टानुसार सलमान खानने आपल्या टीमला बजावलेले आहे की मुलं आणि सीनियर सिटिझन यांच्याप्रती सावध राहा.
 
सलमान जेव्हा कधी आपल्या चाहत्यांमध्ये असतात सुनिश्चित करतात की त्यांना त्रास होऊ नये. 'भारत' च्या प्रीमियर दरम्यान सलमान खानला बघून काही चाहते अनियंत्रित झाले. त्यात एक मुलगा देखील होता. जेव्हा बॉडीगार्ड मुलाशी दुर्व्यवहार करू लागला तर सलमानला राग आला. त्याने गार्डला चापट मारली. आता त्या गार्डला टीममधून काढण्यात आले आहे.
 
या व्हिडिओ सलमानच्या एका चाहत्याने तयार केला असून एका पोर्टलने शेअर देखील केला होता. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावरून हटविण्यात आला आहे. या घटनेवरून सलमान खानला आपल्या चाहत्याची केवढी काळजी वाटते हे तर स्पष्ट कळून येतं.
 
ईदच्या निमित्ताने सलमान खानचा नवा चित्रपट भारत रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच सलमानला बघण्यासाठी त्याचे हजारो चाहते ईदच्या दिवशी त्याच्या घराबाहेर शुभेच्छा देण्यासाठी पोहचले होते. 
 
या दरम्यान सलमान खानने बाल्कनीत येऊन आपल्या फॅन्सला भेट दिली. या वेळी त्याने पांढर्‍या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. या चित्रपटात सलमान कॅटरीना कैफ आणि दिशा पाटनी मुख्य भूमिकेत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती