लहान मुलीला 10व्या वाढदिवसा निमित्त सुष्मिताने दिले खास गिफ्ट, मालदीव जाऊन पूर्ण केली तिची ही विश

मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 (13:15 IST)
सुष्मिता सेन नेहमी आपल्या मुलींसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसते. ती त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असते. नुकतेच तिने तिची लहान मुलगी अलिसाहचा 10वा वाढदिवस साजरा केला. अलिसाहच्या वाढदिवसाच्या दिवशी सुष्मिताने तिला एक खास गिफ्ट दिले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. 

व्हिडिओत बर्थडे गर्ल स्कूबा डायविंगची तयारी नंतर डाइव्हला एँजॉय करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत सुष्मिताने लिहिले, 'अलिसाहला स्कूबा डायविंगची फार आवड आहे पण हे करण्यासाठी 10 वर्षाचे वय गरजेचे आहे.' आता तिची मुलगी 10 वर्षाची झाली आहे तर तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यात आले आहे. 
तसेच सुष्मिताने पुढे लिहिले आहे की यासाठी अलिसाह ने पाच वर्ष वेट केला आहे आणि ती आता 10 वर्षाची झाली असून ती तिचे पहिले स्कूबा डायविंग इंजॉय करण्यासाठी तयार आहे. सांगायचे म्हणजे सुष्मिता आपल्या दोन्ही मुली आणि बॉयफ्रेंडसोबत मालदीव गेली होती. तिथे तिनी आपल्या मुलीची ही विश पूर्ण करून वाढदिवस साजरा केला. ती पुढे म्हणाली की तिने तिच्या मोठी मुलीला देखील येथेच सर्वात आधी डायविंगचा अनुभव घेऊ दिला होता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती