सुशांतच्या आत्महत्येनंतर सारा अली खान अजूनही धक्क्यात, सैफने दिली माहीती

बुधवार, 17 जून 2020 (17:35 IST)
सुशांत सिंह राजपूतने वयाच्या 34 व्या वर्षी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. या बातमीमुळे अनेकांना धक्का बसला आहे. यापैकी एक सारा अली खानदेखील आहे जी धक्का सहन करु शकली नाहीये. 
 
तिने सुशांतसोबत केदारनाथ चित्रपटात काम केलं होत आणि हा तिचा डेब्यू चित्रपट होता. त्यामुळे सुशांतच्या निधानाची बातमी मिळाल्यानंतर ती स्तब्ध झाल्याचं तिच्या वडीलांनी सांगितलें.
 
अभिनेता सैफ अली खान यांनी एका खासगी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की तिचं घरातली वागणूक बदलली आहे. तिला प्रचंड दु:खच नव्हे तर धक्काच बसला आहे असे म्हणावे लागेल. को-स्टार म्हणून आणि अभिनेता म्हणून तिला सुशांत कायम आवडायचा. त्याचा स्वभाव, बुद्धिमत्ता, त्याचं विविध विषयांवर ज्ञान असून तो त्यावर सकारात्मक चर्चा करायचा. तिला सुशांतच्या स्वाभावातील विविध पैलू आवडायचे. त्याच्या चांगुलपणा मी देखील जेव्हा त्याच्या ‘दिल बेचारा’ चित्रपटात कॅमियो केला होता तेव्हा जाणवला आहे. 
 
सैफ अली खानने म्हटले की साराने ही घटना मनाला लावून घेतली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती