‘सेक्रेड गेम्स २’चा ट्रेलर रिलीज

बुधवार, 10 जुलै 2019 (09:10 IST)
वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स २’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्सवर स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्टला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ट्रेलरचे मीम्सदेखील इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. प्रेक्षकांना ‘सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या सीझनविषयी उत्सुकता लागून राहिली आहे. त्रिवेदी का वाचणार? ताबुत काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये मिळणार आहेत. गणेश गायतोंडे, दिलबाग सिंग, सरताज सिंग, बंटी यांच्याभोवती ही कहाणी फिरते. 
 
सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन अनुराग कश्यप, नीरज घेवानने दिग्दर्शित केला आहे. या सीझनमध्ये इतर कलाकारांसोबत कल्की कोचलीन, रणवीर शौरे हे दोन नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. पहिल्या सीझनमध्ये नवाजुद्दीनसोबत बंटीची भूमिका साकारणारा अभिनेता जतिन सरनादेखील दुसऱ्या सीझनमध्येही दिसणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती