स्वरा भास्कर आणि हिमांशू शर्माचे ब्रेकअप

मंगळवार, 9 जुलै 2019 (10:54 IST)
स्वरा भास्कर आणि पटकथा लेखक हिमांशू शर्मा यांच्यातील रिलेशनशीप आता संपुष्टात आली आहे. कंगना राणावतच्या 'तन्नू वेडस्‌मन्नू'मध्ये एकत्र काम करायला लागल्यापासून हे दोघेही एकमेकांना डेट करत होते. दोघांनीही 'तन्नू वेडस मन्नू रिटर्न्स' आणि 'रांझणा'साठीही एकत्र काम केले होते. सर्वात शेवटी 'नील बट्टे सन्नाटा'मध्येही दोघांनी एकत्र काम केले होते. या सिनेमाच्या क्रिएटिव्ह डायरेक्शनची जबाबदारीही हिमांशूवर होती. मात्र भविष्यात आपले रिलेशनशीप काय असावे, याबाबत दोघांमध्येही एकमत झाले नाही. त्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असे काही निकटवर्तीयांनी सांगितले. अद्याप या दोघांनी आपल्या ब्रेकअपची अधिकृत घोषणा केलेली नाही. स्वरा आणि हिमांशूच्या विदेशातील ट्रीपचे फोटो स्वराने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामुळे त्यांचा ब्रेकअप हा अनेकांसाठी धक्कादायक आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती