कियाराला मिळाला आणखीन एक प्रोजेक्ट

मंगळवार, 2 जुलै 2019 (15:30 IST)
'कबीर सिंग' चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे अभिनेत्री कियारा अडवाणी खूप खूश आहे. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीतीची भूमिका प्रेक्षकांना खूप भावते आहे. त्यामुळे सध्या कियाराचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कबीर सिंगच्या यशामुळे कियाराला आणखीन एक चांगला प्रोजेक्ट मिळाला आहे. कियाराची करण जोहरच्या एका चित्रपटात वर्णी लागली आहे. या सिनेमाचं नाव गिल्टी आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. कियाराने यापूर्वीदेखील नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरिजमध्ये झळकली होती. नेटफ्लिक्सवरील हा तिचा दुसरा सिनेमा आहे. करण जोहरने सोशल मीडियावर या चित्रपटाची घोषणा केलीय. या चित्रपटाची निर्मिती धर्माटिक बॅनर अंतर्गत होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रुची नारायण करणार आहेत. गिल्टीची कथा एका छोट्या शहरातील तरूणीच्या दृष्टिकोनातून रेखाटण्यात आली आहे. या चित्रपटात सत्याचे विविध पैलू पाहायला मिळणार आहेत. जेव्हा एक कॉलेजची मुलगी कॉलेजमधील सर्वात प्रसिद्ध मुलाला एका घटनेसाठी जबाबदार ठरवते. या घटनेची खरी कथा काही वेगळीच असते. हा चित्रपट यावर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गिल्टीमध्ये कियारा वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ती बोल्ड व सशक्त भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त कियारा करण जोहरच्या गुड न्यूज चित्रपटातदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच लक्ष्मी बॉम्ब, शेरशाह व इंदु की जवानीमध्येदेखील ती पाहायला मिळणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती