तापसी पन्नू साकारणार मिताली राज?

मंगळवार, 9 जुलै 2019 (15:05 IST)
बॉलिवूडमध्ये खेळाडूंच्या आयुष्यावर अनेक चित्रपट बनले आहेत. ज्यात मेरी कोम, भाग मिल्खा भाग, एम.एस.धोनी सारख्या चित्रपटांनी तर बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. अशातच काही दिवसांपूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजचा बायोपिक येणार असल्याची खूप चर्चा होती. याबाबतच आता एक नवीन माहिती पुढे आली आहे. मिताली राजची भूमिका अभिनेत्री तापसी पन्नू साकारणार असल्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये रंगत आहे. मात्र, सध्या अभिनेत्रीबाबत ऑफिशिअल अनाऊंसमेंट केली गेली नाही. मात्र, रिपोर्टनुसार चित्रपटाच्या दिग्दर्शकांची निवडही अजून बाकी असून चित्रपटाच्या स्क्रिप्टचं काही अजून सुरू असल्याने अद्याप अभेनेत्रीचे नाव घोषित केले गेले नाही. यापूर्वी एका इंटरव्ह्यूमध्ये तापसीने पण या बायोपिकबद्दल आपली इच्छा व्यक्त केली होती. मुलाखतीत तिने सांगितले होते की, जर तिला ही ऑफर मिळाली तर ती खूप आनंदाने हा चित्रपट करेल. त्या मुलाखतीत तापसी म्हटली होती की, ती स्पोर्टस्‌ बायोपिकमध्ये काम करू इच्छिते. तापसीने काही दिवसांपूर्वी 'सूरमा' या चित्रपटात हॉकी प्लेयरची भूमिका साकारली होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती