भारतातून बाहेर पडण्याचा व्होडाफोनचा इशारा

बुधवार, 13 नोव्हेंबर 2019 (11:12 IST)
भारतात व्यवसाय वाढीला वाव दिसत नसल्यानं नव्याने गुंतवणूक करण्याचा कोणताही इरादा नाही, असं व्होडाफोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीक रीड यांनी भारत सरकारला दिला असल्याचं वृत्त ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.
 
त्यामुळे कंपनीच्या भवितव्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
 
दूरसंचार उद्योगात सरकारने हस्तक्षेप टाळावा तसंच 5जी च्या लिलावात उमदेपणाने स्पर्धेत उतरू द्यावं, अशा त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. व्होडाफोनवर युकेमध्ये आधीच कर्जाचा मोठा बोजा आहे. अशा परिस्थितीत वाढीव गुंतवणूक करणं शक्य नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती