काश्मीरमध्ये अपघातात 16 लोकांचा मृत्यू

बुधवार, 13 नोव्हेंबर 2019 (11:07 IST)
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एक प्रवासी वाहन सुमारे 700 मीटर खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात मंगळवारी (12 नोव्हेंबर) 16 जणांचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात दुपारी 3.25 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
 
मृतांमध्ये पाच महिला व तीन मुलांचा समावेश आहे. एकूण 17 प्रवाशांना घेऊन क्लिनीकडून मरमतकडे जाणाऱ्या या एसयूव्ही कारच्या चालकाचे एका वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार रस्त्याशेजारील दरीत कोसळली.
 
हा अपघात एवढा भीषण होता की, 12 प्रवासी जागीच ठार झाले तर चार जणांचा वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातातून केवळ एक प्रवासी बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती