फास्टॅग अनिवार्य झाल्यामुळे फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही अशात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबद सावध केले आहे. NHAI किंवा IHMCL च्या नावानं अगदी हुबेहुब असे बनावट फास्टॅग विकले जात आहेत. पण ते वैध नाहीत, असा अलर्ट देण्यात येत आहे.
या प्रकारे खरेदी करा वैध फास्टॅग
वैध फास्टॅग फक्त IHMCL च्या अधिकृत वेबसाईटवरच मिळेल. किंवा आप आपण MyFASTag App मार्फत खरेदी करु शकता. शिवाय काही बँक किंवा अधिकृत पीओएस एजंटकडूनही खरेदी करता येईल. या बँकांची यादी IHMCL च्या वेबसाईटवर दिली गेली आहे.