Maharashtra Day 2025 Wishes in Marathi महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

मंगळवार, 29 एप्रिल 2025 (14:01 IST)
जय जय महाराष्ट्र माझा, 
गर्जा महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
भाव-भक्तीच्या देशा
बुद्धीच्या देशा
शाहिरांच्या देशा
कर्त्यां मर्दांच्या देशा… 
जय जय महाराष्ट्र देशा 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी
गुणगुणलो जे गीत गीत मराठी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
ज्ञानाच्या देशा,
प्रगतीच्या देशा
आणि संताचा देशा
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा  
 
शिव निष्ठा येथ असे सतत जागती…
अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती… 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी प्राणांची आहुती दिलेल्या
प्रत्येकाला मानाचा मुजरा
अखंड महाराष्ट्राच्या सर्व जनांना
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र
माझ्या राजाचा महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा  
 
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
मंगल देशा
पवित्र देशा
महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
कपाळी केशरी टिळा लावितो
महाराष्ट्र देशा तुला वंदितो
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन
आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन
धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक घुमतो नाद
महाराष्ट्र आहे मराठी माणसांसाठी खास
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
मर्द मराठ्यांचा हा मुलुख
शांतता, आनंद आणि अभिमान असलेल्या
महाराष्ट्राचा अभिमान आहे मला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
महाराष्ट्राची यशोगाथा,
महाराष्ट्राची शौर्यगाथा,
पवित्र माती लावू कपाळी
धरणी मातेच्या चरणी माथा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
ALSO READ: Maharashtra Din 2025: महाराष्ट्र दिन संस्कृती आणि परंपरा जपणारा खास दिवस

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती