भिवानी- ओलंपियन कुस्तीपटू विनेश फोगाट आणि सोमवीर राठी विवाह बंधनात अडकले. दोन्ही कुस्तीपटूंनी समाज आणि देशाला एक संदेश देण्याच्या उद्देशाने लग्नात साताऐवजी आठ फेरे घेतले. आठव्या फेर्यात बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी खिलाओचे वचन घेतले.
झगझगाट वळगळता पारंपरिक रीतीने हुंडा घेतल्याविना विवाह संपन्न झाला. विनेशने गाजरी रंगाचा लहंगा तर सोमवीरने क्रीम रंगाची शेरवाणी परिधान केली होती. विनेशचे काका महावीर फोगाट यांनी म्हटले की आयोजन अगदी साध्या पद्धतीने केले असून वायफळ खर्च केला जाऊ नये याची काळजी घेतली गेली आहे. त्यांनी मुलींच्या शिक्षणावर लक्ष देण्याची अपील केली.
लग्नात कुस्तीपटू साक्षी मलिक, सुशील कुमार, गेवेलिन थ्रो एथलीट नीरज चोप्रा, खासदार दुष्यंत चौटाला समेत अनेक राजकारणी नेते सामील झाले. लग्नात पाहुण्यांसाठी खास मेन्यू ठेवण्यात आला होता ज्यात खीर-चूरमा, बाजरीची भाकरी आणि सरसो-चण्याचे साग व गरम दूध याचा समावेश होता.