मेलबर्न- येथे सुरू असलेल्या हॉपमन चषक टेनिस स्पर्धेत स्वित्झर्लडच्या रॉजर फेडररचे यशस्वी पुनरागमन झाले आहे. तब्बल सहा महिन्यानंतर टेनिस क्षेत्रात पुनरागमन करणार्या फेडररने अलीकडे झालेल्या सामन्यात ब्रिटनच्या डॅन इव्हान्सचा 6-3, 6-4 असा पराभव केला. या विजयामुळे स्वित्झर्लडने ब्रिटनवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे.