तेलुगू टायटन्सने पीकेएल 2022 मध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी फक्त एक जिंकला आहे आणि दोन सामने गमावले आहेत. सध्या ते 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहेत. दुसरीकडे दबंग दिल्ली केसीने तीन सामने खेळले असून तीनही सामने त्यांनी जिंकले आहेत. ते सध्या 15 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांनी आपला शेवटचा सामना जिंकला आहे.
सामना - तेलगू टायटन्स विरुद्ध दबंग दिल्ली केसी, 20 वा सामना
तारीख - 15 ऑक्टोबर 2022, रात्री 8:30 IST
स्थळ - कांतीरवा स्टेडियम, बंगळुरू
तेलुगु टायटन्स
सुरजित सिंग (कर्णधार), सिद्धार्थ देसाई, मोनू गोयत, विनय, विशाल भारद्वाज, परवेश भैंसवाल आणि विजय कुमार.
दबंग दिल्ली केसी
नवीन कुमार गोयत (कर्णधार), संदीप धुल, कृष्णा धुल, विशाल लाथेर, रवी कुमार, आशु मलिक आणि मनजीत.