महेश माझा चांगला मित्र आहे: पेस

मेलबर्न- दुहेरीतील आपला एकेकाळचा सहकारी महेश भूपतीच्या नेतृत्वाखाली आपण चांगली कामगिरी करण्यास उत्सूक आहोत. महेश माझा जोडीदार नसला, तरी माझा चांगला मित्र आहे, असे मत भारताचा टेनिसपटू लिएँडर पेस याने व्यक्त केले.
 
डेव्हिस करंडकासाठी भारताने आता महेश भूपतीला कर्णधार केले आहे. पेस म्हणाला, मला काहीच अडचण नाही. आम्ही चांगली तयारी केली आहे. भारताचा संघ चांगला असून खेळाडू, ट्रेनर, प्रशिक्षक सगळेच एकत्र काम करत आहेत. त्यामुळे आम्हाला या वेळी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

वेबदुनिया वर वाचा