भारतीय महिला संघाने पहिल्या सामन्यात फिलिपिन्सचा 3-1 असा पराभव केला. त्यानंतरच्या फेरीत कझाकिस्तानवर 2.5-1.5 अशी मात केली. तर नंतर व्हिएतनामचा 2.5-1.5 असा पराभव केला. या तीनही विजयांत महत्त्वाचा वाटा आर. वैशाली व पी. वी. नंदिथाचा होता. तिने फिलिपिन्स व कझाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वर्चस्व राखल्यामुळेच भारताची सरशी झाली.
मत्र, कझाकिस्तानविरुद्ध भक्ती कुलकर्णीचा डाव बरोबरीत संपला. व्हिएतनामविरुद्धच्या लढतीत वैशाली व गोम्स यांना विजय मिळवता आले. भारताकडून नवव्या फेरीअखेर वैशालीनेच आपली गुणवत्ता सिद्ध करताना सर्वाधिक 6.5 गुण प्राप्त केले.