कधी सुरू होतोय श्रावण महिना 2023
हिंदू पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिना सुमारे दोन महिन्यांचा असेल. श्रावण महिना 18 जुलै 2023 पासून सुरू होत असून 15 सप्टेंबर 2023 पर्यंत चालेल. म्हणजेच यावेळी एकूण 59 दिवस श्रावण महिन्याचा लाभ भाविकांना मिळणार असून ते मनोभावे शिवभक्ती करु शकतात. हा शुभ संयोग तब्बल 19 वर्षांनंतर घडल्याचे सांगितले जात आहे.
हा विलक्षण योगायोग कसा घडत आहे ?
वास्तविक वैदिक दिनदर्शिकेत सौर महिना आणि चंद्र महिन्याच्या आधारे गणना केली जाते. चंद्र महिना 354 दिवसांचा असतो. आणि सौर महिना 365 दिवसांचा असतो. दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक असतो आणि तिसऱ्या वर्षी हा फरक 33 दिवसांचा होतो, याला अधिक मास म्हणतात. अशा परिस्थितीत यंदा श्रावण दोन महिने चालणार आहे.
ओम नमः शिवाय मंत्राचा जप करताना भगवान शिवशंकराचा जलाभिषेक करावा.
भोलेनाथांना पांढरी फुले, पांढरे चंदन, भांग, धतुरा, गाईचे दूध, धूप, पंचामृत, सुपारी, बेलपत्र अर्पण करा.
हे सर्व अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा आणि चंदनाचा तिलक लावा.
श्रावण सोमवारच्या व्रताच्या दिवशी सोमवारच्या व्रताची कथा अवश्य वाचावी व शेवटी आरती करावी.