सर्व पितृमोक्ष अमावस्या - काय आहे या अमावस्येचे महत्व आणि मिळणारे फायदे जाणून घ्या

सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (08:58 IST)
सर्व पितृमोक्ष अमावस्या ची विधी खूप महत्वाची आहे कारण ते समृद्धी, सौख्य कल्याण आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी साजरे करतात. 
 
श्राद्ध कर्म करणारे यमाचे दैवीय आशीर्वाद मिळवतात आणि कुटुंबियातील मंडळीना कोणत्याही प्रकारच्या वाईट होणं किंवा अडथळ्यांपासून वाचविण्याची विनवणी करतात. या आध्यात्मिक दिवशी, पितरं भेट देतात आणि जर श्रद्धे ने श्राद्ध विधी न केल्यास ते रागवून परत जातात.
 
ज्योतिष शास्त्रानुसार, असे मानले जाते की पितरांनी केलेल्या काही चुका किंवा केलेले पाप पितृदोष म्हणून त्यांचा संततीच्या कुंडलीत आढळतात आणि त्यामुळे त्यांचा मुलं-बाळांना त्यांचा आयुष्यात फार वाईट अनुभव घ्यावे लागतात. या विधींचे पालन करून या दोषांना दूर करून आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळवू शकता.
 
फायदे -
 
* भगवान यमाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी मदत करतं.
 
* भाविकांचे कुटुंब आपल्या जीवनातील सर्व प्रकारांचे पाप आणि अडथळ्यांपासून मुक्त होतात.
 
* हे पितरांच्या आत्मेस सद्गती आणि मुक्ती देण्यास मदत करत. 
 
* हे संततीला एक समृद्ध आणि दीर्घायुष्य असण्याचे आशीर्वाद देतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती