जर श्राद्ध करण्याची इच्छा असणार्या व्यक्तीचे उत्पन्न कमी असेल तर त्याने पितरांच्या श्राद्ध कर्मासाठी यथाशक्ती ब्राह्मणांना भोजन सामग्री ज्यामध्ये पीठ, गुळ, साखर, फळ आणि दक्षिणा द्यावी.
एवढेही करणे शक्य नसेल तर सूर्यदेवासमोर हात जोडून उभे राहा आणि प्रार्थना करा, 'माझ्याकडे पर्याप्त धन आणि साधन नसल्यामुळे पितरांचे श्राद्ध करण्यास मी असमर्थ आहे. यामुळे तुम्ही माझ्या पितरांना माझा आदरयुक्त आणि प्रेमयुक्त नमस्कार त्यांच्यापर्यंत पोहचवा आणि त्यांना तृप्त करा.' या सोप्या उपायांमुळे तुमचे पूर्वज प्रसन्न होतील.