युक्रेनची राजधानी कीवमध्ये पुन्हा एकदा मोठा आवाज ऐकू आला आहे. रशियाने अनेक इराणी ड्रोनवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कीवच्या महापौरांनी वेगळाच दावा केला आहे. रशियाने पाठवलेले 10 इराणी ड्रोन आम्ही पाडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रशियाच्या या हल्ल्यात युक्रेनच्या दोन सरकारी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या हल्ल्यात किती लोक जखमी झाले आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कीव स्थानिक अधिकारी विटाली क्लिट्स्को यांनी टेलीग्रामवर एका पोस्टमध्ये लिहिले की स्फोटांनंतर महापालिकेचे पथक आले होते. या हल्ल्यात इराण बनावटीच्या 'शहीद' ड्रोनचा सहभाग असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की रशियन सैन्याने देशात इतरत्र हल्ले केले आहेत.
युक्रेनला युद्धात आणखी एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. युक्रेनचे उप गुप्तचर प्रमुख जनरल वदिम स्किबित्स्की यांनी सांगितले की, 1990 मध्ये सोव्हिएत युनियनपासून विभक्त झाल्यानंतर युक्रेनने रशियाला दिलेली क्षेपणास्त्रे ऑक्टोबरपासून रशिया त्यांच्यावर हल्ला करत आहे.