Russia -Ukraine War :युक्रेनवर 75 क्षेपणास्त्रांचा मारा, शेकडो ठार,अध्यक्ष झेलेन्स्की यांची पुष्टी

सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (17:52 IST)
युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरांमध्ये क्षेपणास्त्रांच्या आवाजासह जोरदार स्फोट ऐकू येत आहेत. या स्फोटात शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा अधिकृत आकडा अद्याप समोर आला नसला तरी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अनेक शहरांतील इमारतींमधून काळ्या धुराचे लोट बाहेर पडताना दिसले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाने युक्रेनमध्ये कहर करण्यासाठी 12 आत्मघाती इराणी ड्रोन पाठवले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, राजधानी कीववर 75 क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत, त्यापैकी 41 युक्रेनियन हवाई दलाने पाडले आहेत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या कार्यालयावरही क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
 
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, संपूर्ण युक्रेनमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये अनेक लोक ठार आणि जखमी झाले आहेत. झेलेन्स्की म्हणाले की रशियन आम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
 
Edited By -Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती