हवामान विभागाने देशातील पाच राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. तसेच दक्षिण भारतीय राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने कर्नाटकमध्ये अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर रेड अलर्ट घोषित केला आहे. हवामान विभागानुसार देशाच्या उत्तर पूर्व राज्ये आणि मध्य भारत मध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो. तर ओडिसासहित पाच पूर्वेकडील राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
हवामान विभागानुसार छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकसाठी ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. तर, मध्य प्रदेश सोबत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आणि दक्षिण भारतीय राज्यांसाठी येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. आसाम, मणिपुर, अरुणाचल आणि सिक्किम यांसारख्या उत्तर पूर्व राज्यांकरिता येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
सप्टेंबरला छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणासाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर ओडिसा, आंध्र प्रदेश, मणिपुर, मिजोरम, सिक्किम, मेघायल, असम, नागालँड, कर्नाटक, केरल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश करिता येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.