लोकलमध्ये प्रवेश करू देत नसल्याने महिलांनी लोकल रोखून ठेवली

गुरूवार, 4 एप्रिल 2019 (16:23 IST)
मुंबईतील जीवनवाहिनी असलेल्या सेन्ट्रल रेल्वे मार्गावरील दिवा रेल्वे स्थानकात जलद लोकल कर्जत, कसार्‍याववरून येतात. दिवा स्थानकात महिला प्रवाशांना डब्यात चढता येत नाही. असाच प्रकार गुरुवारी पुन्हा दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार येथे घडला होता. दिवा स्थानकात सकाळी 6.56 मिनिटांनी मुंबई सीएसएमटिला जाणारी जलद लोकल आली होती, या लोकल मधील महिलांच्या डब्यात दरवाजात उभ्या असलेल्या महिलांनी दिव्यातील महिला प्रवाशांना डब्यात प्रवेश करूच दिला नाही. 
 
यामुळे दिव्यातील महिलांना याचा संताप अनावर झाल्याने दरवाजात उभे असलेल्या महिलाना दिव्यातील महिलांनी खाली खेचले आणि लोकलच्या मोटरमनला सांगून रेल्वे रुळावर महिला उतरल्या होत्युं, या गोंधळामध्ये रेल्वे समोर महिलांनी उभ्या राहून रेल्वे प्रशासनाचा निषेध करत, लोकल पंधरा मिनिटे रोखून धरली. यामुळे गुरुवारी सकाळीच मध्य रेल्वेची अप मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली होती.

या मार्गावर नेहमीच असा गोंधल होतो महिला दारात उभ्या राहतात त्यामुळे इतर महिलांना लोकलमध्ये चढता येत नाही त्यामुळे अनेकदा भांडणे देखील होतात तर सकाळी नोकरीला आणि इतर ठिकाणी जाण्याची मोठी गर्दी असते त्यामुळे अनेकदा असे प्रसंग घडतात असे घडू नये म्हणून रेल्वेला महिलांनी सूचना केली असून असे पुन्हा झाले तर आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती