पतीने आपल्या पत्नी आणि मुलीच्या डोक्यात घाव घालून निर्घृण खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील (Solapur Crime) करमाळा तालुक्यात घडली आहे. घटनेनंतर पती फरार झाला आहे. हा प्रकार सोमवार (दि.8) सकाळी पावणे दहाच्या सुमारास उघडकीस आला आहे. निर्घृण खूनाच्या घटनेमुळे करमाळा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
लक्ष्मी अण्णा माने (वय-30), श्रृती अण्णा माने (वय-12 दोघेही रा. भिलारवाडी, ता. करमाळा) असे निर्घृण खून झालेल्या मायलेकींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अण्णा माने, मयत लक्ष्मी व श्रृती, मुलगा रोहित व सासू हे एकत्रित भिलारवाडी येथे राहतात.दोन्ही मृत व संशयित आरोपी अण्णा हे एका खोलीत तर मुलगा रोहित हा आजीसोबत दुसऱ्या खोलीत झोपले होते.दरम्यान, पहाटे सहाच्या सुमारास संशयित आरोपी हा दुचाकीवरुन निघून गेल्याचे मुलगा रोहित याने पाहिले होते.त्यानंतर सकाळी लक्ष्मी व श्रृती या दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आल्याने खुनाचा (Murder) प्रकार उघडकीस आला.