गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून चागंलेच रान पेटले आहे. छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर म्हणायचं कि स्वराज्यरक्षक म्हणायचं या प्रश्नावरूनच एकमेकांमध्ये चिखलफेक सुरु आहे. तर दुसरीकडे शरद पवारांना लोक जाणता राजा म्हणतात, यावर भाजपाकडून आक्षेप घेतला जातो, या प्रश्नावर आता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी बोलतांना सांगितले, शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यात काय चूक आहे. आम्हाला म्हणायचा म्हणू. तुम्ही म्हणू नका. शेवटी इतिहासात लिहिले जाईल, कोणी धर्माच्या नावाने पताका फडकावल्या. कोणी सर्वांना बरोबर घेऊन विकास साधला. राज्यकर्त्याला पूर्वीच्या भाषेत राजाच म्हणायचे.