ही घटना नगर शहरातील माळीवाडा परिसरात घडली आहे. शहरातील माळीवाडा वेस येथील शनि मंदिरामध्ये चोरट्यांनी चोरी करत दानपेटी,चांदीची कपाळ पट्टी व डोळे,काळ भैरवनाथ महाराज व जोगेश्वरी मातेचे डोळे असा मुद्देमाल चोरून नेला आहे.
शनि मंदिरातील दानपेटी, चांदीची कपाळ पट्टी, डोळे तसेच भैरवनाथ महाराज, जोगेश्वरी मातेचे डोळे चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतिश शिरसाठ करीत आहेत .