आम्ही पुन्हा ताकदीने पक्ष उभा करतोय - जयंत पाटील

मंगळवार, 16 मार्च 2021 (21:53 IST)
आम्ही सगळे जिवाभावाचे काम करणारे लोक आहोत. पवारसाहेबांविषयी लोकांच्या मनात अतोनात प्रेम आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा अनेकजण व्यक्त करत आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा ताकदीने पक्ष उभा करतोय असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. 
गायकर पक्षातून गेले होते असं कधी जाणवलं नाही. आज आनंद झाला आहे. मालकीच्या घरात आलात अशा अविर्भावात प्रवेश केला आहात. 
शरद पवार या हिमालयाकडे बघून तुम्ही राष्ट्रवादीचे लोक निवडून दिलेत. त्यामुळे ५४ आमदार आले. सत्ता आली नसती तर तुम्ही आला नसतात का? असा सवाल जयंत पाटील यांनी करताच एकच हशा पिकला... कारण लोक सत्ता नव्हती त्यावेळी थांबतही नव्हते याची आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली. 
पिचड यांनी पक्ष सोडला त्यामुळे आम्हाला नवा कार्यकर्ता मिळाला आणि किरण लहामटे निवडून आले. 
पश्चिम घाट योजनेचा फायदा अकोलेला होणार आहे. बंधारे बांधण्याचे काम करत आहोत. भाजपच्या काळात आंदोलन करुनही कामे झाली नाहीत ती कामे किरण लहामटे आमदार झाल्यावर करत आहेत. 
आपल्या घरात आला आहात. गायकर यांनी जिल्हा बँकेवर काम केले आहे. त्यामुळे तालुका मर्यादित न रहाता जिल्हाकडेही त्यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 
नगर जिल्हयात कॅनालची भरपाई खूप दिली आहे. आता अकोले विकासासाठी कटिबद्ध आहोतच परंतु नगर जिल्हाही महत्वाचा आहे. नगर जिल्हयात आता ताकद आणखी वाढणार आहे असेही जयंत पाटील म्हणाले. 
हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे लक्षात ठेवा असे जयंत पाटील यांनी सांगतानाच पिचड यांच्यावर काय अन्याय झाला अशी विचारणा केली.  
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणार आहे. आपल्यातील जीवाभावाचा नेता येतोय त्यामुळे आनंद वाटला आहे.त्यांच्या पाठिशी ताकदीने उभा राहण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असेही जयंत पाटील म्हणाले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती