पुणेकर-मुंबईकर या धबधब्यांवर जाण्यास पूर्णतः बंदी असून येथे जाणे टाळा

शनिवार, 7 जुलै 2018 (10:05 IST)
पर्यटकांची गर्दी आणि धोका लक्षात घेऊन पावसाळ्यात प्रशासनाने रायगड, कर्जत, खोपोलीतील तीन पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घातली असून ६ जुलै 2018 ते ४ सप्टेंबर 2018 कालावधीसाठी ही बंद राहणार असून येथे येण्यास बंदी करण्यात आली आहे. याबाबतीत  कर्जतच्या उपविभागीय दंडाधिका-यांनी हे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार खालापूर - आडोशी धबधबा, खालापूर - आडोशी पाझर तलाव, खोपोली - झेनिथ धबधबा हे प्रमुख धबधबे येथे पूर्णतः बंदी असणार आहे.
 
या तीनही ठिकाणांवर सुट्ट्यांमध्ये पुण्या मुंबईच्या पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. वाहनांची गर्दी आणि पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळं या ठिकाणांवर अनेक प्रश्न निर्माण होतात. वाहतूकीची कोंडी आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांना ही तिनही ठिकाणं धोक्याची केंद्र ठरली आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत आणि पर्यटक सूचनांचं पालन करत नाही त्यामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. हे टाळण्यासाठी ही बंदी घालण्यात आल्याचं प्रशासनाने जाहीर केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती