नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा फाशी घेण्याचा पर्यंत

मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (21:34 IST)
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याच्या निषेधार्थ एमएससीबी(MSEB) ऑफिस मध्ये मुख्य अभियंता समोर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न .
भारतीय जनता पार्टी नेवासा तालुका व शेतकऱ्यांच्या वतीने आज विद्युत कंपनीच्या ऑफिसमध्ये सुमारे चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार व किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.
आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांनी कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास विनंती केली की,आज शेतकरी खूप अडचणीत आहे,शेतकऱ्याकडे कुठलेही पिकं सध्या हातात नाही. साखर कारखाने नुकतेच चालु झाल्यामुळे अजून शेतकऱ्याकडे उसाचेही पेमेंट आले नाही.
त्यामुळे आम्हाला एक महिन्याची मुदत द्यावी व साध्य विद्युत कंपनीने प्रति मोटार तीन हजार रुपये भरून घ्यावे,  परंतु वीज कंपनीचे अधिकारी ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यानंतर नेवासाचे तहसीलदार  रुपेशकुमार सुराणा उपस्थित झाले. त्यांनी ही मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावर ती तोडगा न निघाल्याने आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी विद्युत कंपनीच्या ऑफिसमध्ये फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथील शेतकरी व आंदोलन करते वेळी दखल घेतल्याने मोठा अनर्थ टळला नाही तर एका माजी लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांच्या वीज पंपासाठी प्राण गमावण्याची वेळ 
नेवासा मध्ये आली होती तरीही गेंड्याचे कातडाचे असणारे या अधिकाऱ्यांना थोडासाही शेतकऱ्याचा कळवळा आला नाही माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी विद्युत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही फोन करून चर्चा केली तरीही त्यावर ती तोडगा निघाला नाही सर्व आंदोलन करते दुपारी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत ऑफिसमध्येच ठिय्या आंदोलन करत होते नंतर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी मध्यस्थी करून पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांसाठी रोज एक तास वीज चालू ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन वीज बिलांची होळी होळी करून आजचे आंदोलन समाप्त करण्यात आले. परंतु येत्या दोन चार दिवसांमध्ये नेवासा तहसील वरती भव्य ट्रॅक्टर मोर्चा नेऊन कृषी पंपाचे वीज आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती