पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या तीन संचालकांना अटक केली आहे. संचालक जगदीश मुखे, संचालक आणि कर्ज व आगाऊ रक्कम समिती सदस्या मुक्ती बावीसी आणि संचालक आणि रिकव्हरी समिती सदस्या तृप्ती बने अशी त्यांची नावं आहेत. त्यांना मुंबई न्यायालायात हजर केले जाणार आहे.