बातमीनुसार, शपथविधीदरम्यान किमान 13 लोकांनी त्यांच्या सोन्याच्या चेन, रोख रक्कम आणि 12.4 लाख रुपये किमतीच्या इतर मौल्यवान वस्तू हरवल्याचं सांगितलं आहे. भारतीय न्यायिक संहिता, 2023 च्या कलम 303 (2) (चोरी) अंतर्गत आतापर्यंत 13 एफआयआर नोंदवून, अनेक उपस्थितांनी चोरीच्या तक्रारींसह त्यांच्याकडे संपर्क साधल्याचे मुंबई पोलिसांनी उघड केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक पीडितांनी सोन्याच्या चेन, पर्स आणि मोठ्या प्रमाणात पैसे हरवल्याची तक्रार केली आहे. "आणखी तक्रारी येत आहेत आणि आम्ही सक्रियपणे तपास करत आहोत आणि गुन्हेगारांना ओळखण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचे पुनरावलोकन सुरू केले आहे," असे आझाद मैदान पोलिस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याने सांगितले.
सोनसाखळी हरवण्याबरोबरच रोख रक्कमही चोरीला गेल्याचे पोलिसांनी सांगितले. विलेपार्ले येथील 47 वर्षीय अनंत कोळी यांनी 20,000 रुपये रोख हरवल्याची नोंद केली, तर गर्दीच्या वेळी सोलापूर येथील नितीन काळे (26) यांच्या बॅगमधून 57,000 रुपये चोरीला गेले.